मुंबई मराठी साहित्य संघ

महत्वाचे टप्पे

2019

सुरुवातीच्या 75 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये विविध स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले.

2019

साहित्य संघ -अमृत नाट्य भारती तर्फे प्रथमच राज्य नाट्य स्पर्धेत मराठी , हिंदी, संस्कृत, संगीतनाटक आणि बालनाट्य अशा सर्व विभागातुन सहभाग घेण्यात आला.

मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बालनाट्य शिबिर आणि नृत्यवर्गाचे आयोजन.

2018

24 मार्च 2018 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बहुभाषिक कविसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.

मुंबई मराठी साहित्य संघाची दुर्मिळ प्रकाशने असलेल्या 23 पुस्तकांचे डिजीटलायझेशन केले गेले.

4 ऑगस्ट 2018 साली साहित्य संघाच्या 3-या मजल्यावरिल खोल्यांचे सभागृहात रुपांतरण आणि उदघाटन.

12 एप्रिल 2018- मुंबई मराठी साहित्य संघाने रंगभूमीच्या शतसांवत्सारिक नाट्योत्सवाची आठवण म्हणून नवीन कलाकारांच्या संचात संगीत संन्यस्त खड्ग चा प्रथम प्रयोग सादरा केला.

2017

2 ऑक्टोबर 2017 रोजी अक्षर साहित्य या उपक्रमाचे उदघाटन दिनकर गांगल यांच्या हस्ते करण्यात आले.

29 नोव्हेंबर 2017 रोजी पहिले बालकुमार साहित्य संमेलन चेंबुर येथे आयोजित केले गेले.

2016

मुंबई मराठी साहित्य संघ प्रकाशित ‘तिस-या पिढीचे आत्मकथन’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

2015

25 ऑगस्ट 2015 रोजी साहित्य संघाचे संस्थापक डॉ.अ.ना.भालेराव यांचा 60 वा स्मृतिदिन म्हणून साजरा केला गेला.

2014

21 जुलै 1935 हा साहित्य संगाचा स्थापना दिवस. 2014 साली संघाने 80व्या वर्षात पदार्पण केले आणि हे पुर्ण वर्ष अष्टदशक पर्व म्हणून साजरे केले गेले. आणि या वर्षात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.

नाट्यशाखेतर्फे राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले गेले.

Scroll to Top