मुंबई मराठी साहित्य संघ

साहित्य शाखेचे सध्याचे विविध उपक्रम

ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर यांचे व्यख्यान

संघातर्फे ‘साहित्य संघ व्याख्यानमाला’ अंतर्गत सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. ‘निवेदकाच्या गावा जावे…!’ या विषयावरचे हे व्याख्यान.

४८वे महानगर मराठी साहित्य संमेलन

मुंबई मराठी साहित्य संघ आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४८वे महानगर मराठी साहित्य संमेलन आज, शनिवार, ३१ जानेवारी रोजी गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरातील डॉ. अ. ना. भालेराव सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. हे एकदिवसीय संमेलन ‘मुंबई’ आणि मुंबईतील ‘लोकल ट्रेन’ या विषयाभोवती केंद्रीत असणार आहे.

या साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती शौर्यपदक विजेते व अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते होणार असून, हास्यजत्रा फेम ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन गोस्वामी अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. उषा तांबे स्वागताध्यक्ष असणार आहेत.

संमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता शाहीर नीलेश जाधव यांच्या मुंबईवरील पोवाड्याने होणार आहे. यानंतर संकेत तांडेल लिखित ‘लोकल’ ही एकांकिका सादर करण्यात येणार आहे. ‘आपली मुंबई खरेच बदलली आहे का?’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, महापालिकेच्या पुरातत्त्व खात्याचे माजी अधिकारी संजय आज साहित्य संघ मंदिरात आयोजन साहित्य संस्कृतीसावंत आणि ज्येष्ठ अभ्यासक अरुण पुराणिक सहभागी होणार आहेत. तसेच, गोविंद नारायण माडगावकर यांचे मुंबईवर्णन आणि नितीन साळुंखे यांच्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकातील उताऱ्यांचे अभिवाचन अभिनेता-दिग्दर्शक मंगेश सातपुते आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद करणार आहेत.

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीवर ज्येष्ठ संपादक संजीव साबडे, तर मुंबईतील वाचन संस्कृतीवर संपादक मुकेश माचकर यांचे गप्पाष्टक रंगणार आहे. संमेलनाचा समारोप लोकलमधील ‘रील स्टार’ सानिका कणसे हिच्या रेल्वे भजनांनी होणार आहे. या साहित्य संमेलनासाठी मुक्त प्रवेश असून, मुंबई तसेच जवळच्या शहरांतील साहित्यप्रेमी आणि प्रवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मुंबई मराठी साहित्य संघ आणि स्वामीराज प्रकाशन यांनी केले आहे.

मराठी भाषा दिन

साहित्यरंग’ कार्यक्रमाचे आयोजन
जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई मराठी साहित्य संघाने ‘साहित्यरंग’ कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. बाळ भालेराव सभागृह, गिरगाव येथे संपन्न होईल. या कार्यक्रमात साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष डॉ. उज्ज्वला मेहेंदळे या ‘अभिजात मराठी भाषा आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ या विषयावर, तर साहित्य शाखेच्या कार्यवाह प्रतिभा सराफ या ‘आजची स्त्रीवादी कविता’ या विषयावर बोलतील. चंद्रशेखर गोखले हे नाट्य स्वगत सादर करतील तर प्रतिभा बिश्वास या ‘बोलीभाषा आणि त्यांचे साहित्यातील महत्त्व’ या विषयावर संवाद साधतील. तर ज्योती कपिले या त्यांच्या कवितांचे वाचन करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता देवधर करणार आहेत.

कोरोना प्रादुर्भाव

मार्च 2020 पासून कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले त्यामुळे मुंबई मराठी साहित्य संघ संपूर्णपणे बंद करण्यात आला. पुढचे कुठलेच कार्यक्रम ठरवता आले नाहीत. लॉकडाऊन वाढतच जाणार असे लक्षात आल्यावर साहित्य शाखा आणि नाटय़शाखा दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने एक ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली. यात पुढील विषयांवर लेख, कविता आणि नाटय़प्रवेश ऑनलाईन मागवण्यात आले.
75 दिवसांच्या लॉकडाऊनवर आधारीत 3 वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या. स्पर्धा पद्धती पुढीलप्रमाणे:
पत्र / निबंध / ललितलेखन
स्वरचित काव्यरचना
एकपात्री अभिनय

यास्पर्धेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, दुबई या ठिकाणच्या लोकांनी लेख आणि कविता पाठवल्या. काही लहान विद्यार्थ्यांनीसुद्धा निबंध लिहून पाठवले. साहित्य शाखेच्या सदस्यांकडे हे लेख व कविता इ-मेलने पाठवले. त्यांनी यांचे परीक्षण करून खालील लेख व कविता यांना बक्षिसपात्र ठरवले. त्यांना ऑनलाईन प्रशस्ती पत्रके पाठवण्यात आली.

पुस्तकांचे डिजीटलायझेशन

2017-18 या वर्षांत साहित्य संघाने प्रकाशित केलेल्या 23 पुस्तकांच्या डिजीटलायझेशनचे काम केले. अभ्यासकांना उपयुक्त अशा या जुन्या पुस्तकांची केवळ एकेक प्रत संदर्भ ग्रंथालयात उपलब्ध होती. या पुस्तकांचे डिजीटलायझेशन झाल्यामुळे ही पुस्तके पी. डी. एफ स्वरुपात कायमची उपलब्ध झाली. श्री. अशोक बेंडखळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले.

Scroll to Top