Drama Training Workshop (Online)
मुंबई मराठी साहित्य संघ आणि ड्रामा स्कूल मुंबई आयोजित करित आहे
नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा (ऑनलाईन)
प्रख्यात सेलेब्रिटीस आणि प्रशिक्षित नाट्यकर्मींकडून शिकण्याची सुवर्ण संधी!

श्रेया बुगडे | अभिनेत्री
श्रेया बुगडे हिने बालपणी ‘वाटेवरती काचा’ ह्या नाटकातून आपला नाट्य प्रवास सुरु केला. पुढे गुजराथी, हिंदी, इंग्रजी व मराठी अशा विविध भाषांतील नाटकातून तिने कामं केली. ‘तू तिथे मी’ ह्या झी मराठीच्या मालिकेतून तिने सुरुवात केली व आज ‘चला हवा येऊ द्या’ ह्या लोकप्रिय शोमुळे ती घरोघरी पोहचली आहे.

ह्रिषीकेश जोशी | अभिनेता
हृषीकेश जोशी ह्यांनी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून नाटक आणि अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. ‘शोभायात्रा’, ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘ए भाऊ… डोकं नको खाऊ ‘ ह्या नाटकांसाठी त्यांना राज्य सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक लाभले. २०१८ मध्ये आलेल्या ‘ब्रीध’ ह्या भारताच्या पहिल्या वेब मालिकेत त्यांनी महत्वाची भूमिका साकारली.

प्रियदर्शन जाधव | लेखक, दिग्दर्शक, अभिनेता
प्रियदर्शन जाधव हे नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये लेखन, दिग्दर्शन व अभिनय करणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. ‘गांधी आडवा येतो’, ‘मिस्टर अँड मिसेस’, ‘मुंबईचे कावळे’ ह्या गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले असून ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘शांतेच कार्ट चालू आहे’ ह्या नाटकांमध्ये नट म्हणून त्यांच्या विनोदी भूमिका प्रसिद्ध आहेत.

श्रेया बुगडे | अभिनेत्री
श्रेया बुगडे हिने बालपणी ‘वाटेवरती काचा’ ह्या नाटकातून आपला नाट्य प्रवास सुरु केला. पुढे गुजराथी, हिंदी, इंग्रजी व मराठी अशा विविध भाषांतील नाटकातून तिने कामं केली. ‘तू तिथे मी’ ह्या झी मराठीच्या मालिकेतून तिने सुरुवात केली व आज ‘चला हवा येऊ द्या’ ह्या लोकप्रिय शोमुळे ती घरोघरी पोहचली आहे.

सुदीप मोडक | अभिनेता, दिग्दर्शक
सुदीप मोडक ह्यांना सई परांजपे, निशिकांत कामत, रामू रामनाथन, नसिरुद्दीन शाह, चेतन दातार अशा अनेक दिग्गज दिग्दर्शक व नटांचे मार्गदर्शन लाभले. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘प्यार तुने क्या किया’ अशा विविध मराठी व हिंदी मालिकांमधून त्त्यांनी आपली छाप सोडली व २०१६ मध्ये त्यांना ‘एक शून्य तीन’ ह्या नाटकसाठी दिग्दर्शनाचे नामांकन मिळाले.

नीरज शिरवाईकर | लेखक, दिग्दर्शक
नीरज शिरवईकर हे प्रामुख्याने मराठी रंगभूमीवर काम करणारे महत्वाचे नाटककार आणि दिग्दर्शक आहेत. २०१९-२० मध्ये, आमने सामने ह्या नाटकासाठी त्यांना झी नाट्यगौरवचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पुरस्कार व म.टा. सन्मान तर्फे सर्वोत्कृष्ट लेखक, ही पारितोषिके मिळाली आहेत.

अक्षय शिंपी | अभिनेते, कवी
अक्षय शिंपी ह्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’ मधून नाट्यशास्त्रात उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. २०१० पासून व्यावसायिक स्तरावर पूर्णवेळ अभिनेता म्हणून ते कार्यरत आहेत. सोनी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेतल्या भूमिकेसाठी ते ओळखले जातात. Drama School Mumbai या संस्थेतून नाट्यप्रशिक्षणातील महत्वपूर्ण आवाजसाधना या विषयावरील अभ्याससत्र ते घेतात.

प्रमोद पवार | अभिनेता
प्रमोद पवार हे मराठी कलाक्षेत्रातील एक ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘आर्य चाणक्य’, ‘टिळक आणि आगरकर’ ह्या नाटकातून व ‘यशवंत’ आणि ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ ह्या हिंदी चित्रपटातून तसेच ‘डायल १००’ व ‘अनुपमा’ सारख्या गाजलेल्या मालिकांमधून त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे.